बायजू देणार इतक्या कर्मचाऱ्यांना निरोप…आणि..

तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षण देणारी अग्रगण्य कंपनी बायजू (Byju) मोठ्या प्रमाणावर कमर्चारी कपात करणार आहे. पुढील वर्षीच्या मार्च महिन्यापर्यंत बायजू आपले २५०० म्हणजे जवळपास पाच टक्के कर्मचारी काढून टाकणार असल्याची बातमी आहे. कंपनीला आर्थिक नुकसान झाल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं बायजूकडून कळलं आहे.

बायजूचे कोट्यावधींचे नुकसान

२०२१ -२२ या आर्थिक वर्षात बायजूचं चार हजार पाचशे कोटी रुपयांचं नुकसान झालं असल्याचं या कंपनीच्या सर्वेसर्वा दिव्या गोकुलनाथ यांनी सांगितलं. बंगळूरू इथे मुख्यालय असणारी बायजू भारतासह अमेरिका, मेक्सिको आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये कार्यरत आहे. बायजूच्या ऑनलाईन अ‍ॅपच्या माध्यमातून शिक्षण घेऊन मुलं अभ्यास करतात. २०२३ च्या सुरुवातीपर्यंत भारतात २०० केंद्रे असणाऱ्या बायजूला आता ५०० केंद्रे उभी करायची आहेत. परंतु मागील वर्षी झालेल्या साडे चार हजार कोटींच्या नुकसानामुळे उत्पन्न खूप कमी झाले आहे.

पण शिक्षकांना मिळणार रोजगार..

एका बाजूला कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करून बायजू दुसऱ्या बाजूला शिक्षकांना रोजगार देणार आहे. नवीन व्यावसायिक भागीदार मिळवून परदेशात व्यापार वाढवण्यासाठी १० हजार शिक्षक नियुक्त केले जाणार आहेत. चालू आर्थिक वर्षात नुकसान भरून काढून जास्त फायदा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याचं गोकुलनाथ यांनी सांगितलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.