मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली? आमदाराने सांगितली अंदर की बात !

महाराष्ट्रास चर्चा आहे मंत्रिमंडळ विस्तार नक्की कधी होणार याची. कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होवून एक महिना झाला करी मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे. दरम्यान शिंदे गटातील एका आमदाराने मात्र मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची तारीखच जाहीर करुन टाकली आहे.शिंदे गटातील त्या आमदाराचे नाव आहे अब्दुल सत्तार. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सत्तार दिल्लीमध्ये असून ३ ऑगस्टपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होईल असं सत्तार यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये खातेवाटपावरून चर्चा झाली असून अंतिम बोलणी पूर्ण झाली आहे असा दावाही सत्तार यांनी केला आहे. दिल्लीमधील वरिष्ठ नेत्यांसोबत विचारविनीमय झाला असून अंतिम निर्णयावर लकरच शिक्कामोर्तब होणार असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.
आत्ताच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होणार का असा प्रश्न अब्दुल सत्तार यांना विचारला असता सत्तार म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. तसेच शिंदे गटात आम्ही कोणत्याही अटी ठेवून आलेलो नाही हे सुद्धा सत्तार यांनी स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये अब्दुल सत्तार मंत्री होते.