Cabinet Decision पोलिसांसाठी आनंदाची बातमी ! शिंदे सरकारचा महत्त्वाचा निर्णय !!

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बुधवारी महत्वाची बैठक झाली.त्यात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले त्यात शिंदे सरकारने राज्यातील पोलिसांना मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलिसांच्या नैमित्तिक रजा वाढवण्याचा निर्णय घेतलाय.यामुळे पोलिसांना आता एका वर्षात २० रजा मिळणार आहेत. राज्यातील आगामी पोलीस भरती पारदर्शकपणे करण्यात यावी अशा सूचनासुद्धा CM शिंदे यांनी दिल्या आहेत.
राज्यातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमितिक रजा १२ पासून २० इतक्या वाढविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.पोलिसांवरील कामाचा वाढता ताण, विविध सण आणि उत्सवाच्या अनुषंगाने बंदोबस्त, व्हीआयपी ड्युट्या यामुळे या नैमित्तिक रजा आणखी वाढवून २० दिवस करण्याची विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आलेली आहे.
या बैठकित ७५ हजार पोलिसांची भरती करण्याबाबत शासनाने घोषणा केली आहे.सध्या ७२३१ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आलेली आहे. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारिरिक चाचणी घेण्यात येणार असून मुंबईतील २० मैदानांवर संपूर्ण तयारी करा. तसेच मैदानांवर कॅमेऱ्यांची यंत्रणा तयार ठेवा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.