पुन्हा एकदा नेत्याच्या मुलावर मेहेरबानी !

आपणच खरी शिवसेना हे स्पष्ट करण्यासाठी एकनाथ शिंदे अथक प्रयत्न करताना दिसत आहेत. काही दिवासांपूर्वी त्यांनी शिंदे गटातील नव्या कार्यकारीणीची घोषणा करण्यात आली होती.आता त्यांनी शिवसेना सचिवपदी माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ यांची नियुक्ती केलेली आहे. अभिजीत अडसुळ हे शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे पुत्र आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी अडसुळांना नियुक्तीपत्र दिलं असून त्यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंतही उपस्थित होते.
दरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी नुकतीच युवासेनेची नवी कार्यकारणी घोषित केली. पण शिंदेंच्या सेनेने घोषित केलेल्या या नवी कार्यकारणीत आमदारांच्या चिरंजींवांनाच स्थान देण्यात आलं होतं त्यामुळे सोशल मीडियावर शिंदे गटातील घराणेशाही अशी चर्चा रंगलेली होती. आता अडसुळांच्या मुलाला सचिवपदी नियुक्ती केल्यामुळे पुन्हा एकदा शिंदे गटात घराणेशाही दिसून आलेली आहे.