आता कंपन्यांना द्यावे लागणार 6 एअरबॅग्स; कधीपासून होणार नियम लागू, नितीन गडकरींनी सांगितली तारीख

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतलेल्या एक निर्णयामुळे ऑटो इंडस्ट्रीला मोठा दिलासा मिळालेला आहे. कारमध्ये सहा एअरबॅग बंधनकारक करण्याचा निर्णयाची अंमलबजावणी पुढील वर्षापासून लागू करण्यात येणार असल्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले आहे. गडकरी यांनी ट्विट करुन ही माहिती दिलेली आहे.
Safety of all passengers travelling in motor vehicles irrespective of their cost and variants is the foremost priority.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) September 29, 2022
प्रवाशांची सुरक्षिता लक्षात घेवून केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आठ आसनी कारमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता.या निर्णयाची अंमलबजावणी एक वर्ष लांबणीवर गेली असून 1 ऑक्टोबर 2023 पासून कारमध्ये सहा एअरबॅग लावण्यात येणार आहे. ऑटो इंडस्ट्रीमध्ये सध्या मागणी-पुरवठा साखळीत अडचणी निर्माण झाल्या आहेत त्याचा मोठा परीणाम ऑटो इंडस्ट्रीवर परिणाम होतो आहे. ही बाब लक्षात घेऊन M1 श्रेणीतील वाहनांमध्ये सहा एअरबॅगच्या अंमलबजावणी पुढील वर्षीपासून करण्यात येणार आहे.