यळकोट यळकोट जय मल्हार! या जयघोषाने दुमदुमलेल्या व भंडाऱ्याने माखलेल्या जेजुरी गडाला आज सोन्याप्रमाणे झळाळी मिळाली आहे, कारण चंपाषष्ठी. मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या या चंपाषष्ठीला विशेष अध्यात्मिक महत्त्व प्राप्त आहे. दरवर्षी चंपाषष्ठीचा उत्सव जेजुरी गडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. म्हणूनच नेमकं चंपाषष्ठीचं काय महत्त्व आहे? चंपाषष्ठी का साजरी केली जाते? तेच जाणून घेऊयात
मल्हारी मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासीयांचे कुलदैवत आहेत. मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी तिथीला चंपाषष्ठी चा उत्सव साजरा केला जातो. यादिवशी पूजेत वांगी अर्पण केली जातात, म्हणून याला ‘वांगे छठ’ असेही म्हंटल जात. या दिवशी भगवान शंकराचे अवतार मानल्या जाणाऱ्या खंडोबारायाची पूजा केली जाते. महाराष्ट्रा सोबतच कर्नाटकातील काही भागांमध्ये देखील चंपाषष्ठीचे व्रत केले जाते. महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांचे कुलदैवत खंडोबा असल्याने हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
मल्हारी मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासीयांचे कुलदैवत आहेत. मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी तिथीला चंपाषष्ठी चा उत्सव साजरा केला जातो. यादिवशी पूजेत वांगी अर्पण केली जातात, म्हणून याला ‘वांगे छठ’ असेही म्हंटल जात. या दिवशी भगवान शंकराचे अवतार मानल्या जाणाऱ्या खंडोबारायाची पूजा केली जाते. महाराष्ट्रा सोबतच कर्नाटकातील काही भागांमध्ये देखील चंपाषष्ठीचे व्रत केले जाते. महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांचे कुलदैवत खंडोबा असल्याने हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
नवरात्रीप्रमाणे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे व्रत असते. याकाळात घरोघरी खंडोबाचा कुळाचार केला जातो. कुळाचाराप्रमाणे पूजेत सुघट व देवांचे टाक त्यांची पूजा केली जाते. तसेच रोज फुलांच्या माळा घटावर अर्पण केल्या जातात. या षड्ररात्रोत्सवात सहा दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवला जातो व यथाशक्ती देवाची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे जेजुरी व खंडोबाच्या अन्य देवळांतही चंपाषष्ठीचा हा उत्सव साजरा केला जातो.
चंपाषष्ठीचा उत्सव का साजरा केला जातो? हे सांगणारी व या उत्सवाचे आध्यत्मिक महत्व अधोरेखित करणारी एक पौराणिक कथा प्रचलित आहे. या पौराणिक कथेनुसार, मणि आणि मल्ल हे दोन दैत्य देव, ऋषीं व माणसांना खूप त्रास देत होते. या असुरांचा त्रास सहन करणे असहाय्य झाल्याने ऋषींनी भगवान शंकरांचा धावा केला. त्यानंतर मणि आणि मल्ल यांचा नाश करण्यासाठी भगवान शंकरांनी भगवान खंडोबाचे रूप धारण केले. त्यानंतर मणि आणि मल्ल यांच्या सोबत भगवान खंडोबा यांनी युद्ध केले. हे युद्ध सलग सहा दिवस सुरु होते. या भीषण युद्धात मणिने भगवान खंडोबांची क्षमा मागत आपला पांढरा घोडा अर्पण केला. मार्तंड मल्हार अर्थात भगवान खंडोबा यांनी मणि आणि मल्ल असुरांवर मिळवलेल्या विजयाचा आनंद म्हणून तेव्हापासून चंपाषष्ठी चा उत्सव साजरा केला जाऊ लागला.
मार्तंड-मल्हार यांचे जेजुरी गडावर वास्तव्य होते, म्हणूनच जेजुरी गडावर हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या मल्हारी किंवा खंडोबा नवरात्री मध्ये जेजुरीतील मंदिरात घटस्थापना केली जाते. अमावास्येपासून ते चंपाषष्ठीपर्यंत संपूर्ण सहा दिवस भाविक लवकर उठून मंदिरात खंडोबाच्या मूर्तीसमोर सहा दिवस तेलाचा दिवा लावतात. त्यानंतर चंपाषष्ठीला तळी उचलली जाते. चंपाषष्ठी म्हणजे, त्रासापासून मुक्तीचा दिवस, विजयाचा दिवस म्हणूनच चंपाषष्ठी यात्रेसाठी लाखो भाविक देवाच्या दर्शनासाठी जेजुरीगडावर येतात. चंपाषष्ठी निमित्त जेजूरी गडावर हवन आणि अभिषेकाचा कार्यक्रम पार पडतो. तर या उत्सवाच्या सांगते साठी अर्थात चंपाषष्ठीला खंडेरायाला वांग्याचे भरीत व रोडग्याचा नैवद्य दाखवला जातो, व याच महाप्रसादाचे ग्रहण करून भाविक भक्त त्यांचा सहा दिवसांचा उपवास सोडतात.
विजयाचे प्रतीक असणाऱ्या या सोहळ्याच्या दिवशी आपल्या देवाचे मनोभावे दर्शन करण्याची आस घेऊन जेजुरी गडावर लाखोंच्या संख्येने भाविक गर्दी करतात. व खंडेरायाच्या चरणी प्रार्थना करतात. तर तुम्ही कधी चंपाषष्ठीला जेजुरीला गेला आहात का? तुम्ही चंपाषष्ठीला काय करता? ते कंमेंट करून नक्की सांगा….