शिवसेना फोडायची तयारी अडीच वर्षांपासून सुरू होती का? चंद्रकांत पाटील यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

भाजप नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची नेहमीच चर्चा होते. सध्या त्यांच्या एका वक्तव्यावरुन जोरदार चर्चा रंगलेली आहे. पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर भाजपकडून त्यांचा सत्कार आयोजीत करण्यात आला होता. तेव्हा दोन अडीच वर्षांपासून सांगत होतो की आपलं सरकार येईल. ते सांगायला मी काही वेडा नव्हतो. त्यासाठीची योजना बनवत होतो असा खुलासा चंद्रकांत पाटील यांनी केला. तेव्हा अडीच वर्षांपासून शिवसेना फोडण्याची तयारी सुरू होती का? यावर आता चर्चा सुरु झालीय.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला कार्यकर्त्यांना विश्वास द्यायचा होता. ४० जणांना फोडणं सोपं नव्हतं. त्यासाठी वेळ लागणार होता. त्यासोबत तशी संधी येणं महत्त्वाचं असतं. योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती वेळ साधली, असे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलंय.यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. त्यांनी जो निर्णय घेतला त्यासाठी धाडस लागतं. त्यामुळे आम्ही त्यांना अंतर जाणवू देणार नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.