पीएम किसान योजनेत बदल, शेतकऱ्यांना मोठा धक्का बसणार..?

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना मदत देण्यात येते आहे. दरम्यान ११ व्या हप्त्याचे दोन हजार रुपये देशातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारने हस्तांतरित केले आहेत. आता १२ व्या हप्ता कधी येणार याची वाट शेतकरी पाहत आहेत पण त्या आधी एक मोठी बातमी समोर आलेली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला धक्का बसणार आहे.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेत केंद्राकडून एक बदल करण्यात आलेला आहे. यामुळे देशातील 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांवर परीणाम होणार आहे. या योजनेसाठी सरकारचे PM Kisan पोर्टल कार्यरत आहेत. आता या पोर्टलवरील एक मोठी सुविधा कमी करण्यात आलेली आहे.आता शेतकरी पीएम किसान पोर्टलवर जाऊन आधार क्रमांक टाकून लाभार्थी स्टेटस पाहू शकणार नाहीत. आता सरकारने ही पद्धत बदलली आहे. आता शेतकऱ्यांना स्टेटस पाहण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकणे गरजेचे आहे.

आधी जसे शेतकरी त्यांचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड यांच्या मदतीने लाभार्थी स्थिती पाहू शकत होते, तिथे आता आधार कार्डचा वापर बंद करण्यात आलेला आहे. मग आता प्रश्न पडला असेल शेतकरी लाभार्थी म्हणून स्टेटस कसा पाहणार यासाठी खालील गोष्टी करणे गरजेचे आहे.
सर्वात आधी pmkisan.gov.in वेबसाईटवर जा. त्यानंतर डावीकडील लहान बॉक्समध्ये Beneficiary Status (लाभार्थी स्टेटस) वर क्लिक करा. मग आता एक नवीन पेज ओपन होईल. तिथे तुमचा नोंदणी क्रमांक टाकून तुमचे स्टेटस चेक करा.मग तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक माहीत नसल्यास, Know Your Registration Number यावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या पीएम किसान खात्यावर तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका.आता कॅप्चा कोड येईल तो भरा आणि Get Mobile OTP वर क्लिक करा. यासोबतच बॉक्समध्ये तुमच्या नंबरवर मिळालेला OTP टाका आणि Get Details वर क्लिक करा.आता तुमचा नोंदणी क्रमांक आणि नाव तुमच्या समोर दिसेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.