75 वर्षांनतंर ‘तो’ पुन्हा येणार !!

वन्यप्रेमींसाठी ही आनंदाची बातमी म्हणायला हवी. आपल्या देशातून नामशेष झालेला चित्ता लवकरच भारतात परतणार आहे. नामीबिया भारताला चार नर आणि मादी चित्ता देणार आहे. यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांवर आज दोन्ही देशांकडून स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. चित्ता संवर्धनाला चालना देण्यासाठी भारत आणि नामिबियात करार झालेला आहे.आपल्याकडे स्वातंत्र्यानंतर चित्ता नामशेष झाला होता आणि आता स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात चित्ता पुन्हा भारतात येणार आहे. चित्त्यांची ही तुकडी स्वातंत्र्यदिनापूर्वीच भारतात येण्याची शक्यता आहे. आपल्या देशात १९४८ मध्ये चित्ताचे शेवटचे दर्शन झाले होते त्यानंतर १९५२ मध्ये भारतातून चित्ता नामशेष झाला असे जाहीर करण्यात आले होते. जगातील सर्वात वेगवान प्राणी ही चित्त्याची ओळख आहे.
नामिबियाकडून जे चित्ते भारतात येणार आहेत त्यांना मध्य प्रदेशमधील शेओपूर जिल्ह्यातील कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात त्यांना ठेवण्यात येणार आहे. अतिशिकार आणि अधिवास गमावल्यामुळे चित्त्याचे भारतातील अस्तित्व संपुष्टात आले होते. १९४८ मध्ये छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात चित्त्याचे शेवटचे दर्शन झाले होते. अखेर ७५ वर्षांनंतर नामिबीयाच्या मदतीने चित्ता भारतात परतणार आहे. नामिबीयाच चित्त्यांची संख्या सर्वात जास्त आहे.