सावित्रीबाईंना सोयीस्करपणे वाचलंय का?भुजबळांना का केला जातोय सवाल?

सोशल मीडियावर सध्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची चर्चा होते आहे कारण त्यांनी केलेले देवी सरस्वती संदर्भातील वादग्रस्त वक्तव्य ! सोशल मीडियावर भुजबळांच्या संदर्भात जोरदार चर्चा रंगलेली आहे. भुजबळ म्हणाले होते, सर्व शाळांमध्ये महापुरुषांचे फोटो असावेत. फक्त तीन टक्के लोकांना शिकवून आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी करायची? या वक्तव्यानंतर वाद निर्माण झालेला आहे.
सोशल मीडियावर याची दोन्हीकडून प्रतिक्रिया येते आहे. काही प्रतिक्रियेद्वारे भुजबळांवर कडाडून टीका केली जातेय तर काहीजण मात्र भुजबळांच्या बाजूने आहेत.
CM एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून कुठलेही फोटो काढले जाणार नाहीत. कुणाला काहीही वाटेल. त्यांना वाटेल ते आम्ही करणार नाही. जे लोकांना वाटतं तेच आम्ही करणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले आहे. काल नाशिक येथे पत्रकारांबरोबर ते बोलते होते. भुजबळांच्या वक्तव्यावरुन भाजप आक्रम झाली असून जर भुजबळांना शारदा सरस्वती यांच्या पूजेवर आक्षेप असेल तर मदरशांमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे फोटो का नाही यावरही आक्षेप घ्यायला हवा असे भाजप आमदार गिरीश व्यास म्हणालेत. याआधी शाळेत सरस्वती शारदेचे फोटो कशाला हवे असे वादग्रस्त वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले होते.एकूणच भुजबळांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं असून हा वाद लवकर थांबेल असे काही दिसत नाही.