PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त सोन्याची अंगठी वाटप कार्यक्रम, या राज्यातील BJP युनिटचा खास प्लॅन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारी म्हणजे १७ सप्टेंबर रोजी वाढदिवस असून यानिमित्ताने भाजपकडून देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. भाजपसाठी हा खास दिवस असून तामिळनाडू भाजपने यानिमित्त आगळीवेगळी योजना आखली आहे. पंतप्रधानांच्या जन्मदिनी जन्माला येणाऱ्या मुलांना तमिळनाडू भाजपकडून सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे. तसेच ७२० किलो मासेही वाटले जाणार आहेत.

यासंदर्भात अधिक माहिती देताना तामिळनाडूचे माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन म्हणाले, अंगठी वाटप योजनेसाठी आम्ही चेन्नईतील RSRM सरकारी रुग्णालयाची निवड केलीय. याठिकाणी उद्या जन्माला येणाऱ्या सर्व मुलांना सोन्याची अंगठी दिली जाणार आहे. ही अंगठी २ ग्रॅमची असून त्याची किंमत ५ हजार रुपये आहे. या माध्यमातून पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी जन्माला येणाऱ्या मुलांचे स्वागत करत आहोत असं ही त्यांनी स्पष्ट केलंय. तर मासेवाटप योजनेला पंतप्रधान मत्स्य संपदा योजना असे नाव देण्यात आलं असून ७२० किलो मासे वाटप करण्यासाठी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या मतदारसंघाची निवड करण्यात आलीय. मासे उत्पादनाला प्रोत्साहन देणं हा या योजनेचा उद्देश आहे. पंतप्रधान मोदी ७२ वर्षाचे होत आहेत म्हणून ७२० आकडा निवडला असं मंत्री एल मुरुगन यांनी सांगितलंय.

महाराष्ट्रत सेवा पंधरावडा आयोजित करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती म्हणजे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या १५ दिवसांच्या कालावधीत अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत. दिल्लीतसुद्धा सेवा पंधरवडा साजरा करणार असल्याचे भाजपच्यावतीने सांगण्यात आलंय.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.