CJI Uday Lalit: नाद करायचा, पण…! 12 दिवसांत 4000 खटले निकाली काढले

महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या कामाची सगळीकडे चर्चा होतेय. त्यांनी गेल्या आठवड्यापासून सुप्रीम कोर्टात नवीन सिस्टीम लागू केलीय.निवृत्त सरन्यायाधीश यांनी वकीलांच्या तक्रारीची खंत बोलून दाखविली होती. मला तिकडे लक्ष देता आलं नाही असंही म्हटलं होतं. परंतू, वक्तशीर असलेल्या लळीत यांनी तेच करून दाखवलंय. 

लळीत यांनी १२ दिवसांत खटले कसे निकाली काढायचे याची झलक दाखवून दिलीय. त्यांचा कार्यकाळ हा अवघ्या ७४ दिवसांचा आहे.प्रदीर्घ काळ प्रलंबित खटल्यांची यादी तयार करून ते निकाली काढण्यावर त्यांनी भर दिलीय. लळीत यांनी पदभार स्वीकारल्यापासून एकूण 14000 खटले सूचीबद्ध करण्यात आले होते. त्यातील 3,797 खटले निकालीही काढण्यात आलेत. 

नवीन प्रणालीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या 30 न्यायाधीशांसाठी दोन शिफ्ट करण्यात आल्या असून सोमवार ते शुक्रवार नवीन प्रकरणांवर सुनावणीसाठी १५ वेगवेगळी खंडपीठे नियुक्त करण्यात आली आहेत. या खंडपीठांना दर दिवशी ६० प्रकरणावर सुनावणी घ्यायची आहेत. लळीत यांनी नवीन लिस्टिंग प्रणाली लागू केली असून त्याला जज उघडपणे विरोध करू लागलेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.