राज्यभर सोलापूरचा सोन्या चर्चेत..!

बैलपोळा सण शुक्रवारी राज्यात साजरा करण्यात आला. शेतकऱ्याचा खरा मित्र म्हणजे बैल आणि त्याच्या ऋणईत हा सण साजरा केला जातो. या दिवशी बैलाला छान सजवतात आणि गोडधोड खावू घालतात. शुक्रवारी सगळ्यांनी आपल्या बैलाला सजवलं असेल पण राज्यात सोलापूरच्या बैलाची खूप चर्चा होतेय. हा बैल आहे बार्शी तालुक्यातील अविनाश कापसे यांचा. बैलपोळ्याच्या दिवशी बैलावर गोंडेदार झुली घातल्या जातात पण कापसे यांनी बैलाच्या पाठीवर झुली घातली नाही तर चक्क एक संदेश लिहीला जो राज्यभर व्हायरल होतोय.
मुख्यमंत्री म्हणून तुमचे योगदान विसरता येणार नाही, माझा बळीराजा कोरोना काळातही तुमच्यामुळे सुरक्षित राहिला आहे. अशा आशयाचा संदेश अविनाश कापसे यांनी बैलाच्या पाठीवर लिहीला असून त्याची सगळीकडे चर्चा होते आहे. कोरोना काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले कार्याची सगळ्यांनी दखल घेतली. कोराना काळ आणि ठाकरेंची मुख्यमंत्री म्हणून सजगता कोणी विसरु शकत नाही त्याचेच आभार बळीराजाने अशा प्रकारे मानलेले आहेत त्यामुळे जवळचे दुरावले तरी सोन्या बैलाची थाप असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील अविनाश कापसे यांच्याकडेही बैलजोडी आहे. त्यांच्या सोन्या नावाच्या बैलाच्या पाठीवर, मुख्यमंत्री म्हणून तुमचे योगदान विसरता येणार नाही, माझा बळीराजा कोरोना काळातही तुमच्यामुळे सुरक्षित राहिला आहे. म्हणजेच बळीराजाचा सुरक्षित राहिला तो तुमच्यामुळेच, या दरम्यानच्या काळात बळीराजावर संकट ओढावू दिले नाही म्हणून सोन्या बैलानेच त्यांचे आभार मानले आहेत.