मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर ! कधी? कुठे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार एकाच मंचावर येणार आहेत. तुम्ही अगदी बरोबर वाचत आहात. हे तिन्ही दिग्गज नेते राजधानी दिल्लीमध्ये एकाच व्यासपीठावर येणार आहेत. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सातवे अधिवेशन ७ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे तालकोटोरा स्टेडियम येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे असून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राज्याप्रमाणे केंद्रात सुद्धा ओबीसी मंत्रालय असावं अशी मागणी सुद्धा या अधिवेशनात केली जाणार आहे.देशातून हजारो ओबीसी बांधव या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सातवे अधिवेशनात २२ ठराव ठेवण्यात येणार आहेत. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी नागपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. ओबीसी आरक्षणासाठी फेरविचार याचिकाही दाखल करण्यासंदर्भात या अधिवेशनात चर्चा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कट्टर विरोधक एकाच मंचावर येणे. शरद पवार यांनी संजय राऊत यांना हाताशी धरून शिवसेना संपविण्याचा कट रचलाय असा आरोप अनेक दिवसांपासून होतोय. महाविकास आघाडी राहून राष्ट्रवादीने अडीच वर्षात सरकारी तिजोरी गिळली असे आरोप केले जात आहात. बंडखोर आमदार आणि विरोधक .यांच्यात आरोप-प्रत्योरोपाच्या फैरी झडत आहेत. नेमकं याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाबद्दल सगळ्यांना उत्सूकता लागलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.