असमाधानी ! मिळालेल्या खात्यांबाबत शिंदे गटातील मंत्र्यामध्ये नाराजी ?

राज्यात शिंदे गटातील काही मंत्री असमाधानी असल्याची माहिती समोर आलेली आहे. ग्रामीण भागाशी संबंधीत जसे की ग्रामविकास, जलसंपदा किंवा सार्वजनिक बांधकाम खातं मिळावं यासाठी मंत्री आग्रही आहेत.सार्वजनिक बांधकाम खातं मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे आहे तर ग्रामविकास खाते गिरीश महाजन तर जलसंपदा विभाग उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आहे.
दरम्यान जो मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यात शिंदे गट असमाधानी असून सध्या फक्त कृषी आणि फलोत्पादन हीच ग्रामीण भागाशी सबंधित खाती शिंदे गटाकडे आहेत. या नाराजीमुळेच मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्ली भाजप पक्षश्रेष्ठींसोबत भेट झाली अशी चर्चा सध्या सुरु आहे. गुरुवारी रात्री यासंदर्भात अमित शाह यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली अशी माहिती हाती आली आहे. रात्री उशिरा ही भेट झाली असून या भेटीचे फोटोही त्यांनी आपल्या ट्विटवर शेअर केलेत.
दिल्ली दौऱ्यावर असताना आज केंद्रीय गृहमंत्री श्री. @AmitShah जी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान राज्यातील विकासकामांसह अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.#delhi pic.twitter.com/t20cpmtl9A
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 22, 2022
दरम्यान शिंदे फडणवीस दोघेही पुन्हा दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. 27 तारखेला होणाऱ्या न्यायालयीन सुनावणीबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा होण्याची शक्यता आहे.