महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा दिल्लीत अपमान? सामंत म्हणतात…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नीती आयोग बैठकिच्या एका फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते आहे. या फोटोमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांना शेवट्या रांगेत उभे करण्यात आले आहे असे दिसत आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांनी यावर टीका केली आहे. भाजपकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आता तर शिंदे गटाकडून याबाबत प्रतिक्रिया आलेली आहे.
शिंदे गटातील आमदार उदय सामंत म्हणालेत, ‘कुठे तरी राजकारणासाठी राजकारण करुन विरोध करण्यात अर्थ नाही. महाराष्ट्राचा मानसन्मान एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे नक्कीच वाढलेला आहे. त्याचीच प्रचिती ओबीसीला राजकीय आरक्षण मिळालं.या सगळ्या गोष्टी दिल्लीकडून होत आहेत. शिंदे साहेबांचा कुठे अवमान केलाय असं मला तरी वाटत नाही.’
यावेळी बोलताना उदय सामंत यांनी एक प्रसंग सांगितला,’राष्ट्रपतींचा शपथ ग्रहण सोहळा ज्या दिवशी झाला त्यादिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधना नरेंद्र मोदी यांच्याबाजूला पहिल्या रांगेत होते. हे कोणाला दिसलं नाही हे आपलं दुर्दैव आहे.’