शिंदेंनी जनतेला दिलासा देण्यासाठी कोणत्या घोषणा केल्या?

एकनाथ शिंदे सरकारने आज (सोमवारी) विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. या बहुमत चाचणीत भाजप- शिवसेना शिंदे गटाला 164 मते मिळाली तर महाविकास आघाडीला 99 मते मिळाली. यावेळी, सपा आणि एमआयएमचे आमदार तटस्थ राहिले. यानंतर, सर्वांचे आभार मानताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जबरदस्त फटकेबाजी केली. तसेच, अन्यायाविरुद्ध बंड करणे, ही बाळासाहेबांचीच शिकवण असल्याचेही ते म्हणाले. तसेच, यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला दिलासा देणाऱ्या तीन खास घोषणाही केल्या

हिरकणी गावाचा विकास

हिरकणी गावा संदर्भात, मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी केलेल्या मागणीवर, रायगड किल्ला ही आमची अस्मिता आहे आणि ज्या हिरकणीने इतिहास घडविला, तो हिरकणी गाव वाचविण्यासाठी शासनाच्या माध्यमाने आपण 21 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करतो, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

इंधनावरील कर कमी करणार

जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती वाढल्यानंतर, पंतप्रधानांनी इंधनावरील केंद्रीय कर कमी केला होता. मात्र, इतर काही राज्यांनीही व्हॅट कमी केला होता. पण, महाराष्ट्राने पाच पैसेही कमी केले नव्हते. महाविकास आघाडी सरकारनं पाच पैसेही कमी केले नव्हते. मात्र, आता आमचे हे नवे युतीचे सरकार जनतेला दिलासा देण्यासाठी व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात घेईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याची घोषणा

शिंदे म्हणाले, या राज्यात सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे बळीराजा. त्यांच्या बांधावर जाऊन सर्वच लोकं विचारपूस करत असतात. त्याच्या जीवनात सुखाचे, संमृद्धीचे आनंदाचे दिवस यावेत. यासाठी राज्य सरकार एवढे करेल, की शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र आम्हाला करायचा आहे. यासाठी विरोधी पक्षाचे सर्वांचेच योगदान आम्हाला लागेल. आपण दोघेही मिळून यासाठी काम करूयात, असे शिंदे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.