दसरा मेळाव्यात भाषणादरम्यान लोक निघून गेल्याच्या Viral व्हिडीओंवर CM शिंदे म्हणतात, “कोणी ते व्हिडीओ…”

दसरा मेळावा होवून दोन दिवस झाले तरी अजूनही मेळाव्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत. शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर सुरु असताना जेव्हा मुख्यमंत्री शिंदे भाषण करत होते तेव्हा लोक उठून निघून जात असल्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विरोधकांनी त्यावर कोचक टीप्पणी देखील केली.
This shows that Eknath Shinde could only gather 1/3 of what came to listen #UddhavThackeray Also, Half of crowd in Shinde’s rally were ferried from other districts, people came on their own for Thackeray’s rally Chairs were empty in the back section of #EknathShinde Rally pic.twitter.com/Wa5tFH2zTE
— Imran Solanki (@imransolanki313) October 5, 2022
या टीकेवर मुख्यमंत्री शिंदे यांनी विलेपार्ले येथील कार्यक्रमात प्रत्यत्तर दिलंय. मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत, आमच्यासाठी बाळासाहेब वंदनीय आहेत.त्यांचे विचार आम्ही पुढे घेवून जात आहोत. कोणी काहीही म्हटलं तरी आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेतच आहोत. जो व्हिडीओ व्हायरल झाला तो ट्वीस्ट करुन टाकलेला आहे पण शेवटी संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलं. बीकेसीमध्ये किती लोक आले होते? का आले होते? जर आम्ही चुकीचं काम केलं असतं तर एवढ्या लोकांचे समर्थन आम्हाला मिळाले असते का? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी भाषणात उपस्थित केला. तसेच बीकेसीवर दोन लाखांहून अधिक लोक जमले होते असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
Eknath Shinde. People dispersed to read the pamphlet written by BJP in the crowd ..! pic.twitter.com/mjoLjWL8ax
— Thamarai Shyam (@thamaraishyam) October 6, 2022
दरम्यान बुधवारच्या मेळाव्यात शिंदेंचे भाषण दीड तास सुरु होते. त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला, अनेक मुद्दे कागदांवरुन वाचून दाखवताना ते दिसले. अनेकदा ते घड्याळाकडेही पाहताना दिसले. दहा वाजल्यानंतर ध्वनीक्षेपकाचा वापर करता येत नाही या नियमामुळेच मुख्यमंत्री अनेकदा वेळ तपासून पाहत होते अशी चर्चा देखील सोशल मीडियावर रंगली होती.