CM शिंदेंचा संजय राऊतांना धक्का ! संसदीय नेतेपदावरुन हटवले; ‘या’ नेत्याकडे दिली जबाबदारी

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निर्णय दिल्यानंतर दोन्ही गटांमधील संघर्ष वाढताना दिसतोय. दररोज दोन्ही गट एकमेकांवर ताशेरे ओढत असतात. आता तर संजय राऊत यांची शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आलीय, त्यांच्या जागी संसदीय नेतेपदी खासदार गजानन किर्तीकर यांची निवड करण्यात आलेली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून माहिती दिली.
राऊतांना पदावरुन हटवून एकनाथ शिंदेंनी मोठा धक्का दिलाय. यांसंदर्भात काही दिवसांपूर्वीच खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकारांना तशी माहितीही दिली होती. त्यानुसार, आज ही निवड करण्यात आली. दरम्यान, मागील काही दिवसापूर्वीच शिवसेना नेते आणि खासदार गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला होता. गजानन किर्तीकर यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर रविंद्र नाट्य मंदिर येथील एका कार्यक्रमात गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता.