यंदाचा दसरा मेळावा कोणाचा एकनाथ शिंदेंचा कि उद्धव ठाकरेंचा?

मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजणाऱ्या शिवसेनेत आता दोन गट तयार झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि त्यानंतर राज्यात काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. अगदी शिवसेना कोणाची, धनुष्यबाण चिन्ह कोणाकडे जाणार हा वाद तर थेट सुप्रीम कोर्टात गेलेला आहे. आता त्याच्या निकालासाठी सतत तारीख मिळते आहे. एका बाजूला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे शिवसैनिक मोठ्या संख्येने शिंदे गटाकडे खेचले जात आहेत. त्यात आता एक नवीन गोष्ट चर्चेला आलेली आहे ती म्हणजे यंदाचा दसरा मेळावा कोणाचा एकनाथ शिंदेंचा कि उद्धव ठाकरेंचा?

दरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ज्यांनी दसरा मेळाव्याची परवानगी घेतली आहे तेच दसरा मेळावा साजरा करतील असे उदय सामंत म्हणालेत. आम्ही कुठलेही गट पाडलेले नाहीत. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेत आहेत त्यामुळे आम्ही त्यांचं समर्थन करतो आहोत असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.

दोन वर्षे कोरानामुळे दसरा मेळावा झालेला नाही. तंस पाहिलं तर शिवसेना, शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा असं समिकरण अनेक वर्षांपासून सुरु आहे पण यंदा शिंदे गट शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा हायजॅक करण्याच्या प्रयत्नात आहे असे बोलले जाते आहे. विचारांचं सोनं लुटायला चला हे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील घोषवाक्य असून शिवसेनेच्या पक्ष प्रमुखपदी असलेली व्यक्ती हा मेळावा घेते. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर आता उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून हा मेळावा घेतात.आता यंदा हा मेळावा कोण घेणार हा प्रश्न मात्र चांगलाच चर्चेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.