‘शिंदे भाजप नव्हे तर ‘या’ पक्षाच्या वाटेवर’, खैरेचांही गौप्यस्फोट

काँग्रेस नेते अशोक चव्हाण सध्या चर्चेत आहेत आहेत कारण त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याबदद्ल मोठं वक्तव्य केलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी शिंदेंच काँग्रेसकडे आले होते असे चव्हाण यांनी म्हटले आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी झाल्याचं बोललं जातंय. २०१४ जेव्हा फडणवीस सरकार होते तेव्हा शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा प्रस्ताव दिला होता आणि तो एकनाथ शिंदेच घेवून आले होते असा गौप्यस्फोट चव्हाण यांनी केला. आता यावर नवा वाद सुरु झाला आहे.
आता चव्हाणांच्या दाव्यावर शिवसेनेतूनही प्रतिक्रिया येवू लागलेल्या आहेत. शिवसेना नेते म्हणत आहेत चव्हाण जे सांगत आहेत ते तथ्य आहे. आता शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी यांनी आणखी एक गौप्यस्फोट करून मोठी खळबळ उडवून दिलेली आहे. चंद्रकांत खैरेंनी गौप्यस्फोट करत असा दावा केला आहे एकनाथ शिंदे 15 आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते. तर खासदार विनायक राऊत म्हणाले, अशोक चव्हाण जे बोलले आहेत ते खरे आहे. भाजपच्या अन्यायावर शिंदेंनीच आवाज उठवला होता. आता हेच शिंदे भाजपच्या कसे जवळ गेले ते ईडीचे डायरेक्टर सांगू शकतात असा खोचक टोला विनायक राऊत यांनी लगावला आहे. तर शिंदेंचे खाण्याचे दात आणि दाखविण्याचे दात वेगळे आहेत अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेली आहे.