CM शिंदे यांच्या सूनबाई वृषाली शिंदे राजकीय मैदानात?

नाशिकमधील कळणव येथे शिवध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या शिवध्वज रथयात्रेचा शुभारंभ राज्याचे बंदरे मंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते श्री सप्तशृंगी निवासिनी गडावर पहिल्या पायरीवर पूजन करुन करण्यात आला. या कार्यक्रमाला CM शिंदे यांच्या सुनबाई वृषाली शिंदे, पालकमंत्री दादा भुसे यांच्या पत्नी अनिता भुसे यांची प्रमुख उपस्थिती होती.नाशिकच्या या कार्यक्रमात सौ. शिंदे यांनी भाग घेतल्याने भविष्यात त्या देखील शिंदे गटाच्या राजकारणात सक्रीय होणरा का याची चर्चा आता सुरु झाली आहे. या वेळी उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत माहिती देऊन कामकाजाची सद्यस्थिती शिवस्मारक समिती सदस्य अविनाश पगार, राजेंद्र भामरे, राजेंद्र पगार यांनी दिली.
गडावर ढोलताशा आणि मराठमोळ्या संबळच्या गजरात ‘जय अंबे’चा जयघोष करत शिवध्वज रथाची गावातून मिरवणूक काढण्यात आली. ग्रामस्थांनी शिवध्वजाचे स्वागत केले. गडपासून शिवध्वज यात्रा कळवण तालुक्यातील सर्व गाव- वाड्या- वस्तीवर जाणार असून, ५ ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर शिवस्मारक परिसरात मान्यवरांच्या उपस्थितीत शिवध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.