‘चार चवन्नी घोडे पे, तुम्हारा गोडसे…’ नव्या वादाला तोंड फुटणार?

प्रसिद्ध स्टँण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा नेहमीच त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. कामरावर गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत. आता पुन्हा कुणाल कामरा चर्चेत आलाय. त्याने नथुराम गोडसे यांच्याविरोधात केलेल्या ट्विटमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय.
17 सप्टेंबरला गुरुग्रामध्ये कुणाल कामराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये असा पवित्रा हरियाणातील विश्व हिंदू परिषदेनं घेतल्याचं दिसून आलंय. त्यांनी गुरुग्रामच्या उपआयुक्तांना यासंबंधी एक निवेदन दिले असून त्यामध्ये कुणाल कामरा हा नेहमीच हिंदू देवतांवर टीका करतो. त्याची भाषा, वक्तव्यं ही प्रक्षोभक असल्यानं त्याचा विपरित परिणाम होत असल्याचे त्या पत्रामध्ये म्हटले आहे. कुणालचा शो झाल्यास शहरामध्ये तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ शकते असेही त्या पत्रामध्ये म्हटलं होतं.
हे पत्र व्हायरल होताच कुणालनं सोशल मीडियावर कामाराने आपला राग व्यक्त करत विश्व हिंदु परिषदेला सडेतोच उत्तर दिलंय. त्यानं ट्विटरवरुन आक्षेपार्ह शब्दांत नथुराम गोडसे यांच्याप्रती नाराजी व्यक्त केलीय. त्यामुळे एका वेगळ्या वादाला सुरुवात झालीय. कामराचं ट्विट वेगानं व्हायरल होतंय.