काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक राहुल गांधी लढविणार नाहीत, ‘या’ गोष्टीवरुन झाले स्पष्ट !

देशातील एकेकाळचा जुना पक्ष आणि भाजपचा कडवा विरोधक काँग्रेस अध्यक्ष शोधत आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया 22 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पक्षाचा पुढील अध्यक्ष कोण होणार, याबाबतचा सस्पेंस कायम आहे तसेच देशालासुद्धा हाच प्रश्न पडलाय की पुढचा काँग्रेस अध्यक्ष कोण होणार आहे. अनेक राज्यातील अगदी महाराष्ट्रातील काँग्रेस कमीटीनेसुद्धा
राहुल गांधींना पक्षाध्यक्ष करण्याच्या मागणीचा ठराव संमत केलाय, मात्र राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे चित्र स्पष्ट होते आहे.आता तुम्ही म्हणाला हे कसे शक्य आहे? राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेसाठी देशभर फिरत आहेत. सध्या ते केरळमध्ये असून २३ रोजी थोडा ब्रेक घेऊन २९ रोजी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कर्नाटकात दाखल होणार आहे. १५० दिवसांचा काँग्रेसचा प्रवास आहे तर काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर आहे.आता जी व्यक्ती अर्ज भरणार भले ती गांधी घराण्यातील जरी असली तरी उमेदवाराने दिल्लीत उपस्थित राहणे आवश्यक आहे अशी चर्चा सुरु आहे.
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी अनेक नेत्यांची नावे पुढे येत आहेत. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. १७ ऑक्टोबरला मतदान होणार असून १९ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.तेव्हा आता पाहून काँग्रेसचा अध्यक्ष कोण होतंय.