काँग्रेसने संघाच्या हाफ चड्डीला लावली आग !

काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु आहे. या यात्रेवरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्योरोपांचा जाळ पहायला मिळतोय. आज तर काँग्रेसच्या एका ट्विटने कहर केलेला आहे. या ट्विटमध्ये RSS ची हाफचड्डी जळत असताना दिसते. तसेच १४५ दिवस असा इशारासुद्धा या ट्विटमधून देण्यात आलाय.यामुळे देशात नव्या वादाला तोंड फुटलंय.  “देशाला द्वेषाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी आणि भाजप-आरएसएसने केलेले नुकसान पूर्ववत करण्यासाठी. टप्प्याटप्प्याने, आम्ही आमचे ध्येय गाठू. #BharatJodoYatra”. या ट्विटमध्ये आरएसएसची चड्डी जळत असल्याचे दाखवण्यात आलंय.

काँग्रेसच्या ट्विटवर उत्तर प्रदेशातील सार्वजनिक बांधकाम मंत्री जितिन प्रसाद यांची प्रतिक्रिया दिली असून राजकीय मतभेद स्वाभाविक आणि समजण्याजोगे आहेत. मात्र राजकीय विरोधकांना जाळण्यासाठी अशा प्रकारची मानसिकता काय कामाची? असा प्रश्न विचारलाय. तर भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी ट्विट करत म्हटलंय, काँग्रेसने 1984 मध्ये दिल्लीला आग लावली. 2002 मध्ये गोध्रा येथे 59 कारसेवकांना जिवंत जाळले. ही परिसंस्था आहे. त्यांनी पुन्हा त्यांच्या इकोसिस्टमला हिंसेचा कौल दिला आहे. 

भाजपच्या ट्विटला उत्तर देताना काँग्रेसचे जयराम रमेश म्हणालेत, मला टी-शर्ट, अंडरवेअरबद्दल बोलायचे नाही. जर भाजपला कंटेनर, शूज आणि टि-शर्ट बद्दल मुद्दा काढायचा असेल तर ते या यात्रेला घाबरले आहेत. त्यामुळेते काहीही बोलू शकतात हे दिसून येते. ‘झूट की फॅक्टरी’ सोशल मीडियावर ओव्हरटाइम चालू आहे. यावर भाजपचे संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेवून भारत जोडो यात्रा नसून ‘भारत तोडो’ आणि ‘आग लगाओ यात्रा’ आहे. काँग्रेस पक्षाने असे करण्याची ही पहिलीच वेळ नाही. मला राहुल गांधींना विचारायचे आहे की तुम्हाला या देशात हिंसाचार हवा आहे का? असा प्रश्न केलाय. एकूणच भारत जोडो यात्रेमुळे देशातलं राजकारण तापलंय यात शंकाच नाही. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.