‘त्या’ मर्सिडिजमध्ये तांत्रिक अडचणी होत्या का? मर्सिडिजला विचारण्यात आले 6 प्रश्न

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे रविवारी कार अपघातात निधन झाले. त्यांच्या अपघाती मृत्यूची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आलेले असून पोलीस तपास सुरु आहे. या अपघातादरम्यान अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. सीट बेल्ट लावला नव्हता, गाडीचा वेग प्रचंड होता. दरम्यान ज्या मर्सिडिज कारमध्ये हा अपघात झाला तिची एअरबॅग वेळेवर उघडली असती तर कदाचित मिस्त्री यांचे प्राण वाचले असते असंही आता म्हटलं जातंय. ती एअरबॅग का उघडली नाही, यावरून आता कार क्षेत्रातील तंत्रज्ञांमध्ये मोठी चर्चा सुरु झाली आहे. 

ज्या ठिकाणी सायरस मिस्त्री यांचा अपघात झाला त्या पालघरच्या पोलीस विभागाने मर्सिडिज कंपनीला ६ प्रश्न विचारले आहेत. मर्सिडिज कंपनीच्या टेक्निकल आणि इंजिनिअरिंग टीमला या प्रश्नांवर लवकरच खुलासा करावाच  लागणार आहे. पालघरचे एसपी बाळासाहेब पाटील यांनी विचारलेले सहा प्रश्न पुढीलप्रमाणे…. एअरबॅग का उघडली नाही? कारमध्ये काही तांत्रिक बिघाड होता का? गाडीचे ब्रेक फ्यूइड किती होते? टायरचे प्रेशर किती होते? अनेक कार योग्य तपासण्या केल्यानंतरच प्लांटमधून बाहेर पडतात. त्यात मर्सिडिजच्या अपघाताच्या शक्यतेविषयी काही अहवाल आहे का? अपघात झाल्यानंतर स्टेअरिंग लॉक झाले होते का? 

मुंबईजवळील पालघर येथील चरौती गावात सूर्या नदीच्या पूलावर सायरस मिस्त्रींच्या कारला अपघात झाला. गुजरातमधून मर्सिडिज (MH-47-AB-6705) कारमध्ये ते प्रवास करत होते. कारमध्ये एकूण चौघे होते. डॉ. अनायता कार चालवत होत्या. त्यांचे पती दरीयस हे समोर शेजारच्या सीटवर होते. तर मागील सीटवर सायरस मिस्त्री आणि त्यांचे मित्र जहांगीर पंडोले होते.ही मर्सिडिज पालघरजवळच्या डिव्हायडरला धडकली. मागे बसलेल्या सायरस मिस्त्री आणि त्यांच्या मित्राचा अपघातात मृत्यू झाला. तर पुढील सीटवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाले. याच अपघातावरून संशय व्यक्त केला जातोय. सायरस मिस्त्री बसले होते, तेथील एअरबॅग अपघाताच्या वेळी उघडली असती तर प्राणहानी टळली असती, अशी चर्चा सुरु झालीय. त्यासाठीच मर्सिडिजमध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या का, यासाठी खुलासे मागवण्यात आलेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.