निर्बंधाबाबत मुख्यमंत्र्यांची दिलासादायक घोषणा…

कोरानाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून सणवार साजरे करण्यावर निर्बंध घालणात आले होते. पण आता तुम्ही बिनधास्तपणे सण साजरे करु शकणार आहात. आज सह्याद्री अतिथीगृह येथे सार्वजनिक उत्सवासंदर्भात विविध समन्वय समित्यांबरोबर बैठक झाली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी आता सर्वसण निर्बंधमुक्तपणे साजरे करता येणार आहेत. मात्र या सणांबाबत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे जे आदेश आहेत त्याचं पालन मात्र करणे गरजेचे आहे असे निर्देश दिलेले आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. 

आगामी दहीहंडी,गणेशोत्सव, मोहरम या काळात राज्यात कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राहील या दृष्टीने पोलीस आणि जिल्हा प्रशासनांना निर्देश देण्यात आलेले आहेत.गणेशोत्सापूर्वी राज्यभरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात यावेत.गणेशोत्सव मंडळांना एक खिडकी योजनेतूनच सर्व प्रकारच्या परवानग्या मिळायला हव्यात.गणेशोत्सव सामाजिक भावनेतून साजरा होतो तेव्हा नियम पाळायला हवेत मात्र नियमांचा अवास्तव बावू करु नये. राज्यभरात उत्सवासाठी एकच नियमावली राहील. जिल्हा प्रशासनासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी.मुंबईमध्ये मूर्तीकारांसाठी आणि मूर्तींशाळांसाठी जागा निश्चित करण्यात याव्यात. त्यांच्यावर लावलेल्या जाचक अटी शिथील कराव्यात. सण साजरे करताना अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका ठेवावी तसेच विसर्जन घाटावर वीजेची व्यवस्था करावी असेही सांगण्यात आलेले आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.