ऋतुजा लटकेंचा राजीनामा का रखडला? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

नवं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जोशात अंधेरी पोटनिवडणुकिची तयारी सुरु केली होती पण त्यांच्या मागे लागलेली डोकेदुखी काही संपत नाही. ऋतुजा लटके या महापालिकेच्या कर्मचारी आहेत. त्यांच्या प्रशासकीय सेवेतील राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही. त्यामुळे शिंदे-ठाकरेंमधील सुप्त राजकीय संघर्षाची चर्चा पुन्हा एकदा जोरदार सुरु झाली आहे.

आता ऋतुजा लटके यांनी हायकोर्टात धाव घेतली असून गुरुवारी न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे त्याची सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे ऋतुजा लटके यांचा राजीनामा राजीनामा मंजूर करू नये यासाठी आयुक्तांवर शिंदे गटाकडून दबाव टाकण्यात येतोय तसेच ऋतुजा लटके यांना मंत्रिपदाची ऑफर देण्याचे प्रयत्न सुरू आहेत असे आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अनिल परब पत्रकार परिषद घेवून केलेले आहेत.

या सगळ्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केलाय. राजीनाम्यासंदर्भात काही नियम असतात आणि त्यानुसार तो स्विकारला जातो. नियम सर्वांसाठी सारखे आहेत. महापालिका ही पूर्णपणे स्वायत्त आहे. त्यांच्या नियमांप्रमाणे ते निर्णय घेतील. आमच्याकडून कोणावरही कोणताही दबाव आणला जात नाहीए. सरकार काहीही हस्तक्षेप करत नाही असे फडणवीस यांनी स्पष्ट केलेले आहे. दरम्यान मुंबई मनपा आयुक्त इकबालसिंह चहल यांनी ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यासंदर्भात असा खुलासा केलाय

तर ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत मुंबई महानगपपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनीही खुलासा केलाय. ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर काम सुरू आहे. लटके यांनी ३ ऑक्टोबर २०२२ रोजी राजीनामा दिलाय. नियमांनुसार मी ३० दिवसांमध्ये निर्णय घेऊ शकतो. तसेच शासनाच्या दबावाचा कोणताही प्रश्न येत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.