आदित्य ठाकरेंचं पर्यावरण खातं रोखठोक बोलणाऱ्या आक्रमक नेत्याला?

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज झाला असू भाजप आणि शिंदे गटाकडून प्रत्येकी ९ अशा १८ मंत्र्यांचा शपथविधी संपन्न् झालेला आहे. आता चर्चा होते आहे ती खातेवाटपाची. चांगले खाते मिळावे म्हणावे मंत्र्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. दरम्यान महाविकास आघाडीमध्ये प्रतिष्ठेचं केलेलं खात म्हणजे पर्यावरण खातं. सहसा पर्यावरण खातं घेण्यासाठी कोणी उत्सूक नसतं पण मवीआ सरकारमध्ये आदित्य ठाकरे यांनी हे खातं मागून घेतलं होतं आणि त्यात उत्साहात काम सुरु केलं होतं. पर्यावरण आणि पर्यटन खात्याची धुरा आदित्य यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. आदित्य यांनी या खात्याची प्रतिष्ठा एवढी वाढवली की मविआ सरकारचा पाय उतार झाल्यानंतर या खात्याचे ऑडीट केंद्र सरकारकडून सुरु असून निर्णयांची चौकशी होते आहे. 

असे हे खास प्रतिष्ठेचे खाते आता शिंदे गटाकडून रोखठोकपणे मत मांडणाऱ्या, अगदी बंडापासून शिंदे गटाची बाजू स्पष्ट करुन सांगणाऱ्या दीपक केसरकरांकडे दिलं जाण्याची शक्यता आहे.खरंतर केसरकरांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबद्दल अनेकांना शंका होती कारण त्यांनी पत्रकार परिषदेत राणे पिता-पुत्रांवर केलेली टीका यामुळे त्यांचे प्रवक्तेपद देथील संकटात आहे अशी चर्चा झाली होती. त्यांना माध्यमांशी बोलण्यास मज्जाव करण्यात आला.यामुळे केसरकर यांना मंत्रिपद मिळणार नाही असेच वाटत असताना. शिंदेंनी मात्र केसरकरांवर विश्वास दाखवला आणि चक्क त्यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती दिली. तसेच त्यांना आता आदित्य ठाकरेंचं पर्यावरण खातं देऊन त्यांचं वजनही वाढवंलय अशा चर्चा आहेत 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.