केसरकरांना सिंधुदुर्गपासून लांब ठेवण्यात राणेंना यश?

अखेर सर्व जिल्ह्यांना पालकमंत्री मिळालेला आहे. शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. यामध्ये भाजपला २१ तर शिंदे गटाकडे 15 जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आलेले आहे.उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तब्बल सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. तर शिंदे गटानेही औरंगाबाद, नाशिक, जळगाव स्वतःकडे ठेवण्यात यश मिळवलेले आहे.
या सगळ्या पालकमंत्री पदाकडे लक्ष दिले तर एका गोष्टीची चर्चा राज्यात रंगली ती म्हणजे सिंधुदुर्गची कारण येथे आश्चर्यकारक बदल पहायला मिळालेले आहेत. सिंधुदुर्गच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आमदार रविंद्र चव्हाण यांच्याकडे देण्यात आलेली आहे. खरंतर ते ठाण्याचे आमदार आहेत मग असे कसे झाले. त्याचबरोबर सिंधुदुर्गमधून आमदार असलेल्या आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना कोल्हापूर आणि मुंबईचे पालकमंत्री देण्यात आल्याने केसरकरांसह सगळ्यांनाच आर्श्चयाचा धक्का बसलेला आहे.
आपल्याला माहितच आहे सिंधुदुर्गात राणे-केसरकर वाद कायम आहे. शिंदे सरकार आल्यानंतरही केसरकर-राणे यांच्यातील वाद काही कमी होताना दिसला नाही. गोष्टी टोकाला जात आहेत असे दिसत असताना केसरकरांनी एक पाऊल मागे घेतलं आणि राणेंवर टीका करणार नाही अशी भूमिका घेतली.
जेव्हा फडणवीस आणि मविआ सरकार होतं तेव्हा सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे होतं.फडणवीस सरकारच्या काळात सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून केसरकर आणि नंतर उदय सामंत यांच्याकडे जबाबदारी होती.आता सिंधुदुर्गची जबाबदारी ठाण्याचे भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण यांना देण्यात आलेली आहे. या सगळ्यात एकच चर्चा आहे ती म्हणजे राणेंनी आपलं केंद्रातल वजन वापरून केसरकरांना सिंधुदुर्गच्या पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्याच यश मिळवलेलं आहे.