शिंदे गटाच्या मेळाव्यात स्टेजवरील नेते गेले झोपी, Video Viral !

ठाकरे आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा झाला तरी मेळाव्याबद्दल अजूनही चर्चा सुरुच आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाचा हा पहिलाच मेळावा होता आणि एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी सांगितल्याप्रमाणे तो भव्यदिव्य झाला होता. शिंदे यांनी दसरा मेळाव्यात भाषण करताना ठाकरेंवर आणि विरोधकांवर जोरदार घणाघात केले. मात्र शिंदे यांचे जोरदार भाषण सुरु असताना मंत्र्यांना मात्र झोप अनावर झालेली पहायला मिळाली.
रटाळ वाचन भाषण ऐकून मंत्र्यांनाही झोप अनावर😂 pic.twitter.com/4VEeahYjBM
— yogesh sawant – योगेश सावंत (@yogi_9696) October 6, 2022
शिंदे गटातील मंत्र्यांचा डुलकी काढतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये शिक्षण मंत्री दिपक केसरकर आणि शंभुराज देसाई यांना झोप अनावर होत असल्याचे दिसून आले. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना मंत्री मात्र डुलक्या काढत होते असे त्या व्हिडीओत दिसून आले. या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर ठाकरे समर्थकांनी मुख्यमंत्री शिंदे यांना ट्रोल केलंय. तुम्ही देखील २५ तास काम करता का? असा उपरोधिक सवाल त्यांना करत आहेत.