यांच्या भाषणामुळं मी अस्वस्थ, रात्री झोप लागत नसल्याचं दीपक केसरकरांचं वक्तव्य

राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उद्वव ठाकरेंच्या भाषणातील वक्तव्यांमुळे अस्वस्थ झाल्याचे सांगितलंय. डुक्कर ही भाषा संजय राऊतांच्या तोंडी शोभते. उद्वव साहेबांच्या तोंडी शोभत नाही. एकनाथ शिंदेंचा मला अभिमान आहे पण त्यांच्याबद्दल उद्वव ठाकरे जे बोलले आहेत त्यामुळे मी अस्वस्थ आहे. मला रात्री झोप लागत नाही. त्यासाठी मी शिर्डीला जाऊन दर्शन घेऊन मन शांत करुन आलो असे दीपक केसरकर म्हणाले आहेत ते पुण्यात बोलत होते.
दसरा मेळाव्यात मी झोपलो असा आरोप केला जातो. मी तर विचार करत होतो. मी झोपलो असतो तर माझे हात कसे हलले असते, असा सवाल केसरकर यांनी केलाय.
यावेळी बोलताना केसरकर यांनी TET वर भाष्य केलंय, TET मध्ये ज्या लोकांनी पैसे देऊन पास झाले असतील त्यांना माफी नाही. पोलिसांच्या तपासात दोषी आढळून आले असतील त्यांना वगळून निकाल जाहीर केला जाईल. मुख्य प्रवक्ता म्हणून माझी प्रेस कॉन्फरन्स होईल सर्व उत्तर देईल, असंही त्यांनी स्पष्ट केले. शिक्षक संघटना पगारासाठी 12 ते 15 वर्षे थांबलेल्या आहेत. त्यांना मला सांगायचे आहे लगेच का आंदोलन करता, मला थोडा वेळ द्या, मला महिनाभर द्या. अभ्यास करायला वेळ दिला पाहिजे. माझी न्याय देण्याची तळमळ आहे असंही केसरकर यांनी स्पष्ट केलं.