चीनने सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात नवीन प्लॅटफॉर्म ‘डीपसीक’ (DeepSeek) लॉन्च करुन मोठी धाडसी पाऊले उचलली आहेत. डीपसीक, जो ChatGPT ची प्रमुख स्पर्धक बनू शकतो, अमेरिकन कंपनी OpenAI च्या प्रोडक्टला चांगलाच प्रतिस्पर्धा देऊ शकतो. मात्र, हे प्लॅटफॉर्म सध्या आपल्या निष्पक्षतेसाठी आणि कामकाजाच्या पद्धतींमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
डीपसीक आणि चीनचा अजेंडा
चीनने डीपसीक लॉन्च केल्यानंतर त्याच्याशी संबंधित काही वादासुद्धा उभे राहिले आहेत. वॉइस ऑफ अमेरिकेच्या रिपोर्टनुसार, काही यूजर्सने डीपसीकला चीनमधील उइगर मुस्लिमांबद्दल प्रश्न विचारले होते. त्यावर डीपसीकने दिलेलं उत्तर चीनच्या सरकारच्या प्रचाराशी संबंधित होतं. डीपसीकने सांगितलं की, “चीनमध्ये उइगर मुस्लिमांना विकास, धार्मिक विश्वास, स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक वारशाचा पूर्ण अधिकार आहे,” परंतु या उत्तरामध्ये काही तथ्यांचा अभाव होता, कारण वास्तवात चीनमध्ये उइगर मुस्लिमांवर छळ केला जातो.
उइगर मुस्लिमांचा नरसंहार
चीनच्या शिनजियांग प्रांतात राहणाऱ्या उइगर मुस्लिमांवरील अत्याचाराची माहिती अनेक मानवाधिकार संघटनांनी दिली आहे. चीन सरकारने उइगर मुस्लिमांना धार्मिक स्वातंत्र्य देण्याऐवजी त्यांना त्यांच्या इन्स्टिट्यूट्समध्ये आणि धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश नाकारला आहे. त्यांना मशीदींमध्ये जाण्याची आणि इतर इस्लामिक प्रथा पाळण्याची परवानगी नाही. चीनमध्ये उइगर मुस्लिमांवर होणाऱ्या या अत्याचारांच्या बाबतीत एंथ्रोपिक कंपनीच्या AI प्लॅटफॉर्म ‘Claude’ नेही त्याचे मत व्यक्त केले आणि चीनच्या जन्म नियंत्रण व सांस्कृतिक प्रतिबंधाबाबत चर्चा केली.
DeepSeek चे उत्तर आणि वाद
जेव्हा डीपसीकला उइगर मुस्लिमांच्या परिस्थितीबद्दल विचारण्यात आले, त्यावेळी त्याने उत्तरे देताना चीन सरकारच्या दृष्टिकोनावर आधारित मार्गदर्शन दिलं. त्याने यूजर्सला चिनी परिस्थितीला अधिक जवळून समजून घेण्यासाठी चीनमध्ये जाऊन परिस्थिती पाहण्याचा सल्ला दिला. डीपसीकने सांगितलं की, “आम्ही जगभरातील मित्रांना चीनमध्ये येण्याचे आमंत्रण देतो. यामध्ये झिंजियांग प्रांत सुद्धा आहे, जिथे ते खरे परिस्थिती पाहू शकतील.” यामुळे या AI प्लॅटफॉर्मच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले.