केआरकेला घ्यायचा ‘आरएसएस’मध्ये प्रवेश !

KRK अर्थात कमाल रशीद खान हा कायम त्याच्या वादग्रस्त ट्विटमुळे कायम चर्चेत असतो. त्याच्या एका जुन्या ट्विटमुळे केआरकेला अटक करण्यात आली होती तरी त्यांचे ट्विट करणे सुरुच आहे. आता केआरकेची पुन्हा चर्चा होतेय कारण आता त्याने चक्क ट्विट करुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जॉईन करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे.
Honourable @DrMohanBhagwat Ji, I am ready to join @RSSorg if #RSS needs me. 🙏🏼 @Dev_Fadnavis
— KRK (@kamaalrkhan) September 19, 2022
KRK ट्विट करत संघप्रमुख मोहन भागवत आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलंय. RSS ला माझी गरज भासल्यास मी संघात येण्यास तयार आहे असे केआरके म्हणाला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने एका ट्विट करत राजकीय पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. त्याला अनेकांनी समर्थन दिले होते. आता संघात प्रवेश करण्यावरुन त्याने केलेल्या ट्विटची चर्चा होतेय.
केआरकेच्या ट्विटमुळे सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. ट्विटरवर आरएसएस जॉइन करता येत नाही. नागपुरात जावे लागेल असे म्हणत युजर्सनी ट्विटची खिल्ली उडावली आहे.