फडणवीस यांना पक्षनिष्ठेचं फळ मिळालं !

भारतीय जनता पक्षाने संसदीय समिती आणि निवडणूक समिती जाहीर केली आहे. यात मोठे फेरबदल दिसून आलेले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संसदीय समीतीत घेण्यात आले आहे तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पक्षाच्या संसदीय समितीमधून डच्चू देण्यात आला आहे. गडकरींनी स्थान न देता देवेंद्र फडणवीस यांचा समावेश केंद्रीय निवडणूक समितीमध्ये केल्यामुळे सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे. गडकरी यांच्याप्रमाणे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनासुद्धा संसदीय समितीमधून हटविण्यात आलेले आहे.
नवीन संसदीय समितीचे सदस्य
जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष), नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह, बीएस येडियुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के.लक्ष्मण, इक्बाल सिंग लालपुरा, सुधा यादव, बीएल संतोष (सचिव)
केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य
जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष),नरेंद्र मोदी,राजनाथ सिंह,अमित शाह,बीएस येडियुरप्पा,सर्बानंद सोनोवाल, के लक्ष्मण, इकबाल सिंग लालपुरा,सुधा यादव, सत्यनारायण जातिय, भूपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, बीएल संतोष (सचिव), व्ही श्रीनिवास (पदाधिकारी)
बीएस येडियुरप्पा, इक्बाल सिंग लालपुरा, सर्बानंद सोनोवाल, के. लक्ष्मण यांचा संसदीय समितीत समावेश करण्यात आलेला असून जेपी नड्डा संसदीय समितीचे अध्यक्ष आहेत. सुधा यादव या एकमेव महिलाचा समावेश संसदीय समितीमध्ये करण्यात आलेला आहे. केंद्रीय निवडणूक समितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि ओम माथूर यांना नव्याने स्थान देण्यात आलेले आहे.