‘या’ भेटीचा काय आहे ‘राज’कीय अर्थ?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शासकीय निवास्थान सागर बंगल्यावर भेट घेतली. या दोघांमध्ये तासभर चर्चा झाली असून या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची शक्यता बोलली जातेय.
ही भेट अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. त्यामुळे या भेटीमागे नेमके काहीतरी महत्वाचे कारण असू शकतं अशी चर्चा आहे. या आधी देखील दोघांमध्ये भेट झाली होती, मात्र त्या भेटीची आधी माहिती देण्यात आली होती. मात्र या भेटी संदर्भात दोघांकडून कोणत्याही प्रकारे अधिकृत माहिती देण्यात आलेली नव्हती. राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया झाल्यापासून गेल्या दोन महिन्यांपासून कोणाच्याही भेटीगाठी करत नव्हते, मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळते आहे. याआधी जुलै महिन्यात दोघांची भेट झाली होती.
फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर राज ठाकरेंनी फडणवीसांचं कौतुक करणारं पत्र पाठवलं होतं. मनसेच्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी शिवसेवेर सडकून टीका करत भाजपची बाजू घेतली होती.आता पुन्हा दोघांची भेट म्हणजे नक्कीच काहीतरी खास आहे असे म्हणायला हरकत नाही.