देवेंद्र फडणवीसांना दिल्लीचे धक्के?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन नावं खूप गाजत आहेत एक म्हणजे एकनाथ शिंदे आणि दुसरे देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्रात भाजपचे नेतृत्व कोण करत असेल असे जर विचारले तर एकच चेहरा समोर येतो तो म्हणजे फडणवीस त्यांना तर राजकारणातील चाणाक्य असे ही म्हटले जाते. महाराष्ट्राचत भाजपचे जे काही निर्णय आहेत ते सर्व देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानाचे घेतले जातात. हे जरी खरं असलं तरी केंद्रीच नेतृत्वाकडून फडणवीस यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न होतोय अशी चर्चा रंगलेली आहे. कारण फडणवीस यांनी घेतलेले निर्णय आणि केंद्रीय नेतृत्वाकडून आलेले आदेश यात तफावत दिसून येते आहे. 

आपल्याला माहित आहे जेव्हा शिंदे गट-भाजपने जेव्हा राज्यात सत्ता स्थापन केली तेव्हा शिंदे मुख्यमंत्री होतील आणि आपण बाहेरून सरकारला पाठिंबा देणार असे फडणवीस म्हणाले होते पण काही मिनिटीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिला फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हावं. हा फडणवीस यांच्यासाठी पहिला धक्का होता. मनात इच्छा नसताना फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली हे स्पष्टपणे जाणवत होतं.याची नाराजी समोर आली ती अगदी दुसऱ्या दिवशी. जिथे जिथे भाजपचा जल्लोष झाला तिथे भाजपचं केंद्रीय नेतृत्वातील मोठं नाव म्हणजे अमित शाह यांचं नाव कुठे नव्हतं.

त्यानंतर काहीकाळाने मंत्रिपदाचा विस्तार झाला.त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. भाजमध्ये एक व्यक्ती एक पद या नियमामुळे पाटील यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपद विर्दभातील ओबीसी नेता चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आलं. हा फडणवीस यांच्यासाठी दुसरा धक्का आहे. बावनकुळे हे गडकरींच्या अगदी जवळेच, २०१९मध्ये विधानसभेसाठी बावनकुळेंना तिकीट नाकारण्यात आलं त्यामुळे ओबीसींचे खच्चीकरण फडणवीस यांनी केलं अशी टीका झाली. त्याचा परीणाम २०१९च्या निकालात दिसलाच. फडणवीस यांच्यामुळे भाजपचे अनेक नेते शांत राहीले किंवा बाजूला पडले असेही म्हटले गेले. याबद्दल फक्त खडसेंनी उघडपणे आरोप केले  

सध्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून आशिष शेलार यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे. केंद्रीय नेतृत्वाने घेतलेले हा निर्णय म्हणजे पुन्हा फडणवीस यांच्यासाठी दुसराधक्का आहे अशी चर्चा सुरु आहे.  

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.