शिवसैनिकाने निष्ठा दाखवली, मग ठाकरेंनी कमाल केली !

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत दोन गट तयार झाले आहेत.एक आहे ठाकरे गट तर दुसरा शिंदे गट ! शिंदे गटात दररोज इनकमिंग वाढलेले आहे. दरम्यान काही निष्ठावंत आजही ठाकरेंसोबत आहेत. आपली नीष्ठा व्यक्त करण्यासाठी शिवसैनिकविविध फंडे वापरत आहेत. दरम्यान धुळ्यातील एका एसटी कामगाराने आपली निष्ठा फार वेगळ्यापद्धतीने दाखवली आहे. त्याने चक्क आपल्या रक्तानेच निष्ठापत्र लिहुन ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.
धुळ्यातील त्या एसटी चालकाचे नाव मनोज गवळी असून ते एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्षसुद्धा आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या पत्राची तातडीने दखव घेतली असून जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे यांच्याशी संपर्क साधत मनोज गवळी यांना भेटीसाठी थेट मातोश्रीवर बोलावुन घेतले.
मनोज गवळी मातोश्रीवर आल्यानंतर त्यांच्या पक्षनिष्ठतेबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. मातोश्रीवर मनोज गवळी यांची आपुलकीने चौकशी करण्यात आली. मातोश्रीवर मिळालेल्या प्रतिसादाबद्दल भारावुन गेले अशी प्रतिक्रिया मनोज गवळी यांनी दिलेली आहे.
शिवसेनेगटबाजी या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसाला पुष्पगुच्छ नकोत. सदस्यनोंदणी आणि शपथपत्रांचे गठ्ठे हवे आहेत असे सांगितले होते. सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश देखील दिले होते की लवकरात-लवकर शपथपत्र द्यावीत. शिवसेना कोणाची? हा वाद सोडविण्यासाठी ही कागदपत्रे महत्वाची ठरणार आहेत.