‘आलिया_ MY_ Foot’, ट्वीटरवर का होतंय ट्रेन्ड?

बॉलीवूडला सध्या ग्रहण लागलंय ते BOYCOTT, मोठं मोठे स्टार आणि प्रोड्युरर्स यांनी BOYCOTTचा धसका घेतलेला आहे. लाल सिंग चड्ढा,रक्षाबंधन समशेरा ,दोबारासारखे सिनेमे जबरदस्त आपटले आहेत. आता आणखी एक सिनेमा  बॉयकॉटच्या वाटेवर आहे. तो म्हणजे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा एकत्र केलेला पहिला सिनेमा ‘ब्रम्हास्त्र’ !

‘ब्रम्हास्त्र’ सिनेमा 9 सप्टेंबरला प्रदर्शित होतोय पण त्या आधीच सोशल मीडियावर #आलिया_My_Foot हा ट्रेंड जोरात सुरु आहे, brahmastra  सिनेमाला आता जोरदार विरोध होतोय.विरोध करण्यामागे बरीच कारणं आहेत त्यापैकी एक कारण आहे एक फोटो जो सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होतोय. ज्यात पाकिस्तानमध्ये महापूर आला त्यावेळी आलिया आणि रणबीरकडून त्यासाठी कोटी रुपयांची मदत केली गेलीये.अशी ती पोस्ट आहे. या पोस्टवर ट्रोलर्सचा पाऊस पडत असून आसाम मध्ये पूर आला तेव्हा हे कुठे होते असं विचारलं जातंय.दुसऱ्या एकानं लिहिलंय,’कुठे गेला होता बॉलीवूडवाल्यांचा पैसा जेव्हा भारतात कोरोनामुळे लोक मरत होते’. तर काही लोकांनी बॉयकॉट गॅंगला समजावण्याचा देखील प्रयत्न केला आहे की आलिया-रणबीर संदर्भातील बातमी खोटी आहे. पण लोक मात्र ऐकण्याच्या मनःस्थितीत मुळीच दिसत नाहीत.

बीबीसी हिन्दी च्या सोशल मीडिया अकाऊंटवरनं ही बातमी शेअर केली गेली होती. पोस्ट व्हायरल झाल्यानंतर बीबीसी हिंदीने स्वतः स्पष्टीकरण देत एक ट्वीट केलं आहे ज्यात रणबीर-आलिया संदर्भात केलेली पोस्ट फेक असल्याचं म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.