आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला का?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केला आणि शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट तयार झाले आहेत. ठाकरे आणि शिंदे गटातला संघर्ष गणेशोत्सवाची सांगता होत असताना पहायला मिळाला. शुक्रवारी मध्यरात्री ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात जोरदार राडा झाला. आधी बाचाबाची त्यानंतर त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. या हाणामारीचे पडसाद शनिवारी देखील उमटले. ठाकरे गटाकडून या राड्याबद्दल ठाकरे गटाने जोरदार आरोप केले. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दोनदा गोळीबार केला असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला.
या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून पोलीस या व्हिडीओच्या माध्यमातून खरंच सदा सरवणकर यांनी गोळीबार केला का याचा तपास करत आहेत. तुम्ही देखील हा व्हिडीओ नीट पाहू शकता. प्रभादेवी चौकातील हा व्हिडीओ आहे.या व्हिडीओत समाधान सरवणकर आणि शिंदे गटाचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे दिसतायेत. ते दोघे रागारागाने महेश सावंत यांना शिवीगाळ करतायेत. त्यानंतर तिथे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर येताना दिसत आहेत. त्यांच्या खांद्यावर बॅग आहे. काही वेळानंतर सदा सरवणकर यांनी बॅगेतून काहीतरी काढल्याचं दिसतंय. आता त्यांच्या हालचाली पाहा या हालचालीवरुन शिवसेनेने असा आरोप केलाय की सरवणकर यांनी बंदुक लोड केलीय.
शिवसेनेचा आरोप आहे सरवणकर यांनी गोळीबार केला पण सरवणकर यांची हालचाल पाहिली तर त्यांनी नुसती बंदुक लोड केली की गोळीबार झाला हा प्रश्न आहे. या व्हिडीओत एका महिलेचा आवाज असून सरवणकर यांनी पिस्तुल काढली की काहीतरी काढलं असं ती म्हणते आहे. शिवसेनेकडून आरोप होतोय की सरवणकर यांनी गोळीबार केलाय. आता सरवणकर यांनी खांद्यावरच्या बॅगेतून पिस्तुल काढली की खिशातून पिस्तुल काढली हाच प्रश्न आहे. आता सदा सरवणकर यांनी गोळीबार केला याचा तपास पोलीस याच व्हिडोओच्या आधारे करत आहेत.