दुपारी जेवणानंतर झोपेचे अनेक तोट, डुलकी फायदेशीर !

दुपारी जेवल्यानंतर डोळ्यावर झोप येतेच. पण दुपारच्या अशा झोपेनं फायदा होण्याऐवजी तोटेच होतात. दुपारी झोपल्यानं रात्रीची झोप तर विस्कळीत होतेच सोबतच आरोग्यास इतरही आजारांचा धोका निर्माण होतो. दुपारी झोपणं का वाईट आहे का? दुपारी झोपल्यामुळे होतात ३ तोटे
१. रात्री शांत आणि पुरेशी झोप घेणं याचा संबंध हार्मोनच्या निर्मितीशी आणि हार्मोन्सच्या स्ंतुलनाशी असतो. पण दुपारी झोप घेतल्यानं रात्रीची झोप विस्कळीत होते. लवकर झोप लागत नाही, शांत झोप लागत नाही.
२. दुपारच्या झोपण्यानं मनाला उदासी येते. नैराश्याचा आजारही उद्भवू शकण्याचा धोका असतो.
३. दुपारी झोपल्यानं पोट फुगल्यासारखं वाटतं. काही न खाता पिताही शरीराला जडपणा आल्यासारखा वाटतो. दुपारच्या झोपमुळे मधे मधे खाण्याचा मोह होतो. आणि मधे मध्ये सतत खाल्ल्यानं इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात.
४. दुपारी झोपल्यानं वजन वाढतं.
५. शरीरावर सूज निर्माण होण्यास दुपारची झोप कारणीभूत ठरते. रोज दुपारी तासनतास झोपणं आणि रात्री उशिरा झोपणं, रात्रीची झोप पुरेशी न घेणं यामुळे शरीरावरील सूज वाढते.
डुलकी फायद्याची
१. दुपारी जेवणानंतर तासनतास झोपण्याऐवजी 10 ते 20 मिनिटांची छोटी डुलकी घेणं फायद्याचं असतं. यामुळे सजगता वाढते. ताजंतवानं वाटतं. दुपारी अर्ध्या तासापेक्षा जास्त झोपू नये. दुपारी 3 वाजेनंतर झोपल्यास रात्रीची झोप विस्कळीत होते, त्यामुळे दुपारी 3 नंतर झोपणं टाळावं.
२. झोपण्यापेक्षा 10 ते 20 मिनिटांची डुलकी घेतल्यास शरीर आणि मनाला आराम मिळतो. छोटीशी डुलकी घेतल्यानं रक्तदाब वाढत नाही, थकवा येत नाही. मेंदूचं कार्य उत्तम चालतं. सजगता वाढते. क्रिया प्रतिक्रियांचा वेग वाढतो. झोपण्याऐवजी दुपारी छोटी डुलकी घेतल्यानं काम करण्याची ताकद आणि उत्साह वाढतो तसेच मूडही सुधारतो. पचन क्रियेला, मेंदुला आराम मिळतो.