अश्लील ऑडिओ क्लीपवर आमदार संतोष बांगर यांचा मोठा खुलासा

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. त्यावर ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांनी मुख्यमंत्री शिंदे हे संतोष बांगर यांच्यावर कारवाई करणार का, असा सवाल सुद्धा उपस्थित केला होता. यावरून संतोष बांगर यांच्यावर विरोधक टीकेची झोड उठवत असताना बांगर यांनी मोठा खुलासा केलाय.
संतोष बांगर म्हणाले, ती ऑडिओ क्लिप माझी नाही. हे कट कारस्थान सुरू आहे. बदनाम करण्याचं काम सुरू आहे. महाराष्ट्रात अनेक कलाकार आहेत. हा माझा आवाज कुणी तरी मिमिक्री केला आहे. मला बदनाम करण्याचं काम सुरू आहे. तुम लाख कोशिश कर लो, मुझे बदनाम करने की, में जब भी बिखरा हु, दुगनी रफ्तार से निखरा हु।, अशी शेरोशायरी संतोष बांगर यांनी केली आहे. मी काय करतो हे मतदार संघात जाऊन पाहा. यावेळी बोलताना बांगर यांनी अयोध्या पोळ यांच्यावरही भाष्य केलं. त्या महिला ताईला सांगतो माझा जप करू नको. देवाचा जप कर. तुला यश मिळणार असे म्हणाले.