ITR फाईल करताना ‘या’ चुका करु नका !!

आयटीआर भरण्याची अंतिम तारीख आहे ३१ जुलै आणि ती आता काही दिवसातच ती तारीख येईल. अनेकजण आयटीआर दाखल करण्यास उशीर करतात आणि अंतिम तारीख जवळ आली की खूप घाईगडबड करतात. खरंतर करदात्यांनी आयटीआर वेळेत आणि कोणतीही चूक न करता भरायला हवा. आता कोणत्या चुका टाळायला हव्यात त्याची माहिती पुढीलप्रमाणे आहे…

१.आयटीआर फॉर्म – आयटीआर भरताना तुम्हाला कोणता फॉर्म भरायचा आहे ते तुमच्या उत्पन्नाचे स्वरूप आणि करदात्याची श्रेणी यानुसार ठरलेले असते. तेव्हा  करदात्याने त्याला लागू असलेला फॉर्मच निवडण करण त्याला बंधनकारक असते. 

जर तुम्ही चुकीचा फॉर्म भरला तर तो आयटीआर अग्राह्य धरला जाणार नाही. शिवाय तुम्हाला विभागाकडून डिफेक्ट नोटीस येईल. मग काय ती चूक ठराविक मुदतीच्या काळात दुरुस्त करावी लागेल.

२. व्यक्तिगत माहिती आणि बँक तपशील –  २०२१-२२ चे आयटीआर फाइलिंग जेएसओएन युटिलिटीवर आधारित आहे. त्यात वैयक्तिक माहिती टॅक्स पोर्टलच्या आयटीआर फॉर्ममधून स्वयंचलित पद्धतीने येते.करदात्याने टॅक्स पोर्टलमध्ये पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल आयडी अगदी अचूक भरायला हवा.बँक अकाउंटची माहिती देताना कोणतीही चूक करु नका अन्यथा तुम्हाला रिफंड क्रेडिटमध्ये समस्या येवू शकते. 

३. २६ एएस, फॉर्म एआयएस यांची जुळणी – उत्पन्नाची योग्य माहिती दाखल होण्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने वार्षिक माहिती निवेदन (AIS) फॉर्म सादर केला आहे. करदात्यांना फॉर्म AIS आणि फॉर्म २६ AAS यांना अनुरूप आयटीआर भरायचे असते. दोन्हींतील आकडेवारीत तफावत येता कामा नये याची काळजी घ्यायला हवी. 

४. उत्पन्नाच्या सर्व स्रोतांची माहिती – बचत खात्यामधील व्याज, मुदत ठेवीवरील व्याज, घराचे भाडे वगैरे तुमच्या सर्व उत्पन्न स्त्रोतांची माहिती आयटीआरमध्ये देणे फार गरजेचे आहे. समजा तुम्ही उत्पन्न लपविले तर करदाता अडचणीत येऊ शकतो.

५. सूट असलेल्या उत्पन्नाची माहिती देणे – PPFवरील व्याजाचे उत्पन्न, सुकन्या समृद्धी खात्यावरील व्याज, नातेवाइकांकडून मिळालेल्या भेटवस्तू  खरंतर यावर प्राप्तिकर लागत नाही. मात्र, त्याची माहिती आयटीआरमध्ये देणे बंधनकारक असते अन्यथा तुम्हाला त्यावर सूट मिळू शकत नाही. 

६. आयटीआर-व्ही पडताळणी – आयटीआर भरल्यानंतर ई-पडताळणी करावी लागते. CPI ला मॅन्युअल स्वरूपात हस्ताक्षर केलेली ITR-V प्रत पाठवावी लागते. जर तुम्ही आयटीआर-व्ही पडताळणी केली नाही तर तुमची सगळी मेहनत फुकट गेली म्हणून समजा.

७. फॉरिन टॅक्स क्रेडिट क्लेमसाठी फॉर्म ६७ – विदेशातील प्राप्तिकराचे क्रेडिट क्लेम करावयाचे असल्यास तुम्हाला आयटीआर दाखल करण्यापूर्वी फॉर्म ६७ भरणे आवश्यक आहे. याशिवाय विदेशात अदा केलेल्या करांचे पुरावे जोडणेसुद्धा गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.