आषाढी एकादशी स्पेशल, उपवासाची भेळ !!

आषाढी एकादशीच्या दिवशी फराळाला नेमकं काय करावं हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो. त्यामुळे आम्ही तुमच्याकरता आषाढी एकादशी स्पेशल म्हणून उपवासाची भेळ घेवून आलो आहोत. वाचूया नेमकी कशी करायची उपवासाची भेळ ?
साहित्य
1) साबुदाण्याची तयार खिचडी (जर का वाटीभर साबुदाणा असेल तर ३/४ वाटी उकडलेल्या बटाटयाच्या फोडी या साबुदाणा खिचडीत टाकाव्यात आणि शेवटी थोडासा लिंबाचा रस टाकावा)
2) एक लहान वाटी नॉयलॉन साबुदाणा तळून घेतलेला
3) बारीक चिरलेली काकडी
4) एक वाटी खारे शेंगदाणे
5) एक वाटी तळलेला बटाटा कीस
6) साखर
7) एक मोठी वाटी दही
कृती
1) सर्वप्रथम आधी साबुदाण्याची खिचडी तयार करुन घ्यावी. नंतर नॉयलॉन साबुदाणा चांगला तळून घ्यावा.
2) नंतर एका डिशमध्ये साबुदाण्याची खिचडी टाकावी.
3) नंतर त्यावर २-४ चमचे खारे शेंगदाणे, थोडासा तळलेला साबुदाणा, त्यावर तितकाच बटाटयाचा कीस, त्यावर एक मोठा चमचा साखर घातलेलं दही टाकावं. त्यावर ३-४ चमचे बारीक चिरलेली काकडी, हे सर्व पदार्थ त्यावर वरुन टाकावे. खाणार्याने आपल्या आवडीप्रमाणे हे सर्व मिसळून घ्यावेत.