
Does a father need a reason to talk to his son?" – Ritesh Deshmukh Emotional!
मराठी चित्रपटसृष्टीचा सर्वात प्रतिष्ठित सोहळा ‘झी चित्र गौरव 2025’ मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यात एक हृदयस्पर्शी क्षण घडला, ज्याने प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणले. अभिनेता Riteish Deshmukh याला वडील विलासराव देशमुख यांचं पत्र ऐकून भरून आलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
🎭 भावनांचा कडेलोट – Ritesh Deshmukh Emotional Moment
झी गौरव पुरस्कार सोहळ्यात अभिनेता Jitendra Joshi ने एक खास पत्र वाचून दाखवलं. हे पत्र होतं दिवंगत माजी मुख्यमंत्री आणि रितेश यांचे वडील Vilasrao Deshmukh यांचं. पत्राच्या ओळी ऐकताच रितेशच्या डोळ्यात पाणी तरळलं, तो अतिशय भावूक झाला.
📜 “सप्रेम नमस्कार, विनंती विशेष…” – वडिलांचं पत्र
“सप्रेम नमस्कार विनंती विशेष, पत्रास कारण असंय की या पत्रास काहीही कारण नाही. बापाला मुलाशी बोलायला कधीपासून कारणांची गरज भासू लागली. आमचा दांडगा जनसंपर्क तुम्हाला माहीतच आहे. तुमचा पहिला मराठी चित्रपट पाहताना खूप भरून आलं. माऊली हा चित्रपट पाहताना तर अभिमान वाटत होतं. दिग्दर्शक म्हणून तुमचा ‘वेड’ हा पहिला चित्रपट पाहिला अन् खात्री पटली की यापुढे अशीच आनंदाची अनुभूती आम्हा प्रेक्षकांना मिळत राहील. ‘तुझे मेरी कसम’चा आमचा समज तुम्ही ‘वेड’मध्ये खोटा ठरवाल असं वाटलं होतं, पण नाही. सूनबाईल अजूनही तुम्हाला पुरून उरत आहेत. गंमल बाजूला, पण रितेश.. तुम्ही वयानं आणि कर्तृत्वानं कितीही मोठे झालात तरी आम्हाला दिसतो.. तो भावंडांसोबत विहिरी पोहणारा, गुडघे फोडून सायकलची फेरी मारणारा, मातीत ढोपर सोलवटून गोट्यांचे डाव जिंकणारा, क्रिकेटची बॅट खांद्यावर घेतलेला आमचा लहान मुलगा” या ओळींनी प्रत्येकाचं मन हेलावलं.
🎥 सोशल मीडियावर व्हायरल झाला Video
रितेशने याआधीही अनेकदा आपल्या वडिलांविषयी भावना व्यक्त केल्या आहेत, पण हा प्रसंग वेगळाच होता.
🎬 Ritesh Deshmukh चा आगामी भव्य चित्रपट!
पत्राच्या शेवटी लिहिलं होतं, “तू आता अवघ्या भारताचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट आणतो आहेस. लूक टेस्ट पाहिली आणि डोळे भरून आले…” Ritesh च्या आगामी चित्रपटाची चर्चा यामुळे आणखी वाढली आहे.
