संजय राऊतांच्या जामिनाबाबत हाय व्होल्टेज ड्रामा

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊत यांच्या जामिनाबाबत कोर्टाने इडीला उत्तर द्यायला सांगितलं होतं. ईडीने कोर्टापुढे हे उत्तर सादर करत संजय राऊत यांच्या जामिनाला विरोध केलाय. या पत्रामध्ये ईडीने काही महत्त्वाचे दावे केलेत. पत्राचाळ आर्थिक घोटाळ्यात संजय राऊत सहभागी असल्याचा पुरावा आहे. 1039 कोटी 79 लाखांच्या पत्राचाळ घोटाळ्याचा तपास हा अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहे, असं ईडीकडून कोर्टाला सांगण्यात आलेले आहे.
या व्यवहारात 1 कोटी 6 लाख आणि 1 कोटी 17 लाख ही रक्कम खात्यात मिळाल्याचा पुरावा आहे, पण ही रक्कम संशयास्पद असल्याचा इडीचा दावा आहे. संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यातील 1 कोटी 8 लाखांचं ट्रान्झाक्शन संशयास्पद असल्याची माहिती ईडीने कोर्टाला दिलेली आहे.
5 सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत कोर्टाने संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 19 सप्टेंबरपर्यंत वाढ केली होती. यानंतर राऊतांनी 7 सप्टेंबरला जामीनासाठी अर्ज केला. राऊतांच्या जामीन अर्जावर 16 सप्टेंबरपर्यंत उत्तर द्या, असे आदेश कोर्टाने ईडीला दिले होते.