खडसे अमित शाहंच्या थेट संपर्कात ! राष्ट्रवादी सोडणार?

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडेस पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत. खडसेंच्या स्नुषा आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. यामुळे खडसे राष्ट्रवादीच अस्वस्थ आहेत का असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालाय. सुनबाई रक्षा खडसे यांच्यासोबत ते दिल्लीला अमित शाह यांची भेट घ्यायला गेले होते. ही बातमी म्हणजे राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेची बाब आहे तर खडसेंच्या मनात नक्कीच काहीतरी चलबीचल आहे असे म्हटले जातेय. 

खडसे दिल्लीला अमित शाह यांना भेटायला गेले ही गोष्ट त्यांनी लपवून ठेवली होती पण त्यांचे कट्टर राजकीय विरोधक शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी हे बिंग भरसभेत फोडलं. मुक्ताईनगर येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत शिंदे गटातील आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसे आणि अमित शाह यांच्या भेटीचा गौप्यस्फोट केला. खडसेंच्या दिल्लीवारीची बातमी पाटलांनी लीक केल्यावक खडसेंनी चांगलीच आगपाखड केलीय.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. अमित शाह यांना भेटू नये असा नियम आहे का?  पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचा परिचय आणि माझे संबंध हे जेव्हा गोधडीत होते तेव्हापासूनचे आहेत असं उत्तर खडसे यांनी दिलं आहे.अमित शाह यांना आधीसुद्धा मी भेटलो होतो आणि नंतरही भेटणार आहे. देवेंद्रजींना आधी भेटलो होतो आणि नंतरही भेटणार आहे. म्हणून याचा अर्थ वेगळा काढण्याची गरज नाही तुमच्यासाठीच आहे का असंही खडसे म्हणालेत.

खडसे हे अमित शाह यांच्या भेटीला गेले होते या बातमीला त्यांच्या सूनबाई खासदार रक्षा खडसे यांनी पण दुजोरा दिलाय. अमित शाह यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे भेट झाली नाही खडसेंची फोनवर अमित शाह यांच्याबरोबर चर्चा झाली असे रक्षा खडसे यांनी सांगितले आहे. केंद्रीय यंत्रणा पाठिशी लावून भाजप विरोधी पक्षातल्या नेत्यांना त्रास देत असल्याचा आरोप केला जातोय.तसेच विरोधीपक्षातले लोक भाजपमध्ये दाखल झाले तर त्यांच्यामागचा केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा संपतो असाही आरोप आहे. खडसेंच्या मागे ईडीचा ससेमिरा सुरु आहे तो थांबविण्यासाठी खडसे काय पर्याय निवडतात ते पहावं लागणार आहे.  

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.