शिंदे-फडणवीस सरकारचा ठाकरेंना पुन्हा दे धक्का !

राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याच्या महाविकासआघाडी सरकारच्या निर्णयाचा फेरविचार करण्यात येईल, असे शिंदे सरकारने म्हटले आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या शहरांच्या नामांतराच्या निर्णयावर शिंदे-फडणवीस सरकारने आक्षेप घेतला आहे. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यानंतर सरकारला, असे निर्णय घेता येत नाहीत, अशी भूमिका नव्या सरकाने घेतली आहे. या निर्णयांचा फेरआढावा घेतला जाईल आणि नामांतराचा निर्णय नव्याने घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान हे सरकार गोंधळ्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.
औरंगाबादचे नामांतर प्रस्ताव रद्द केला, हा हिंदुत्वाला धक्का असल्याची प्रतिक्रिया शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी दिली आहे. या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याची प्रतिक्रीया दानवे यांनी दिली आहे. त्यामुळे या शहरांच्या नामांतराचा वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.