शिंदेंकडे ८, ठाकरेंकडे २ त्याआधीच शिंदेंचा मोठा डाव!!

एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन तर केली पण सध्या शिंदे सरकार वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत.मुख्यमंत्री शिंदे यांच्या समोरील आव्हाने अजून संपलेली नाहीत. त्यांच्यावर पात्रतेची टांगती तलवार कायम आहे. शिंदे गटातील प्रत्येक आमदारावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. आम्हीच खरी शिवसेना हे शिंदे गटाला सिद्ध करायचं आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण त्यांना मिळवायचं आहे. कारण तसं झालं नाही तर ठाकरेंच्यी शिवसेना आपल्यापेक्षा सरस ठरु शकते हे शिंदेंना चांगलंच माहित आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यावर सुनावणी होणार आहे. शिंदे निवड़णुक आयोगाकडे देखील गेलेत
दरम्यान शिंदेंनी एक मोठी खेळी खेळलेली आहे. जो उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का आहे असं मानलं जातंय. महाराष्ट्रातील आमदार, खासदार, पदाधिकारी यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिलाय पण आता तर महाराष्ट्राबाहेरील शिवसेनेच्या राज्यप्रमुखांनी शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केलाय. मंगळवारी शिंदे गटाची बैठक झाली त्यात महाराष्ट्राबाहेरील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला त्यात
८ राज्यांच्या प्रमुखांचा समावेश आहे. दिल्ली, छत्तीसगड, मणिपूर, गोवा, बिहार यासह इतर राज्याचे राज्यप्रमुख तसेच पदाधिकाऱ्यांनी आपण शिंदे गटासोबत आहोत असं जाहिर केलंय. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगासमोर शिंदेगटाने आपणास खरी शिवसेना असल्याचा दावा केला. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आपल्याला द्यावं अशी मागणीसुद्धा शिंदे गटाने केली. सुप्रीम कोर्टामध्ये 29 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
दुसरीकडे शिंदे गटाने दसरा मेळाव्याची तयारी सुरु केलीय म्हणजे शिवसेनेच्या पारंपरिक सोहळ्यावर शिंदेंनी आपला हक्क सांगितला आहे. ठाकरेंचे शिवतिर्थ बहुधा एकनाथ शिंदेंना दसरा मेळाव्यासाठी मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात आलीय. तर ठाकरे गटाने बीकेसी मैदान मिळावं म्हणून अर्ज केलाय. याचाच अर्थ शिवतिर्थावर शिंदे गटाचा दसरा मेळावा होवू शकतो. दिवसेंदिवस शिंदे गटाला पाठिंबा वाढतो आहे आणि इनकमिंग अजून सुरुच आहे. अशा प्रकारे राज्यप्रमुखांना आपल्याकडे वळत शिंदेंनी ठाकरेंना चितपट करण्याचा प्लॅन अधिक भक्कम केल्याचं दिसून येतंय. तेव्हा आता निकाल कोणाचा लागतो आणि विजय कोणाचा होता हे येत्या काळात समजेलच.