शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार ?

महाराष्ट्रात सध्या सगळ्यात जास्त चर्चा होतेय ती एकाच प्रश्नावर ती म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार. वारंवार मिळत असलेल्या तारखा आणि दिल्लीवारी यातच दोन मंत्री अ़डकले आहेत असे म्हणत विरोधकांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका करत आहे. दरम्यान अशी माहिती हाती आली आहे की सुप्रीम कोर्टात बंडखोर आमदारांच्या अपत्रातेच्या कारवाईवर सुनावणी होणार आहे त्यामुळे छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार केला जाण्याची शक्यता आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप आणि शिंदे गटातील मंत्र्यांची नावे निश्चत झाली असून त्यात फडणवीस यांचे ८ समर्थक आमदारांचा समावेश आहे. त्यात गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, रविंद्र चव्हाण यांच्यासह भाजपाचे ८ जण मंत्रिपदाची शपथ घेतील. यामध्ये चंद्रकांत पाटील,सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रशेखर बावनकुळे या माजी मंत्र्यांचा समावेश असेल.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकिती महाराष्ट्रातील ४८ जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे असा दावा केंद्रीय मंत्री दानवे यांनी केला होता. त्याला स्पष्टकरण देताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणाले होते, शिंदे गटाचे खासदार निवडून देणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही आमचा पक्ष मजबूत करत आहोत. तरी शिवसेनेच्या खासदारांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व शक्तीचा वापर करु असे फडणवीस म्हणालेत. तर सुप्रीम कोर्टातील सुनावणीमुळे मंत्रिमंडळ विस्तारात काही अडखळे येण्याचे कारण नाही येत्या काही दिवसात चित्र स्पष्ट होईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात येत्या १२ ऑगस्टला सुनावणी होणार आहे.